21 डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस
या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात, ज्यामुळे दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का? २१ डिसेंबरला सूर्य पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल. त्यामुळे या दिवशी आपल्या भागात सर्वांत लहान दिवस पावणे अकरा तासांचा व रात्र सव्वा तेरा तासांची राहणार आहे. एका वर्षात 365 दिवस असतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण यामध्येही असा एक दिवस असतो जो वर्षातील सर्वात लहान दिवस मानला जातो. त्याला इंग्रजीमध्ये Winter Solstice असे म्हटले जाते. वर्षातला हा सर्वात लहान दिवस शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबर महिन्यात येतो. 21 किंवा 22 डिसेंबर रोजी वर्षातील सगळ्यात लहान दिवस मानला जातो. या दिवशी सूर्य हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आपल्या शिखर बिंदूवर पोहोचतो.त्यामुळेच तो सर्वात लहान दिवस असतो.