वीजबिल शून्य, वीज विकून उत्पन्नाचीही संधी..! • योजना महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी लागू छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती, घरगुती वापरापेक्षा जास्त झाल्यास वीजबिल शून्य जास्त निर्मित ऊर्जा महावितरणला विकून उत्पन्न मिळविण्याची सुवर्ण संधी...! वीज ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे खालीलप्रमाणे अनुदान वितरित. १ किलोवॅटपर्यंत : ३०,००० रुपये अनुदान मिळेल. २ किलोवॅटपर्यंत : ६०,००० रुपये अनुदान मिळेल. ३ किलोवॅट व त्यापेक्षा जास्त : ७८,००० रुपये (कमाल) अनुदान मिळेल. गृहनिर्माण संस्था, घर संकुलासाठी : ९० लक्ष रुपये(कमाल) (५०० किलोवॅट पर्यंत स्थापित क्षमतेनुसार १८,००० रुपये प्रति किलोवॅट) छतावरील सौर ऊर्जेद्वारे दरमहा वीजनिर्मिती • १ किलोवॅट - १२० युनिट प्रति महिना वीज तयार होते. • २ किलोवॅट - २४० युनिट प्रति महिना वीज तयार होते. • ३ किलोवॅट – ३६० युनिट प्रति महिना वीज तयार होते. • २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती क्षमता. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सोय. • सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन हरित ऊर्जा निर्माते बनून पर्यावरण संरक्ष...