१५ डिसेंबर छत्रपती शाहूराजे भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी माणगाव जवळील गांगुली गावात झाला. ते छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे पुत्र होते. १८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले . हाच संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहास मध्ये अजरामर झाले. त्याचवेळेस लाखो सेना सागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता . संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते . नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला. त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता . रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले .तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता . ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन , औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले . दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते . औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असल...