शिरीष कुमार मेहता (२८ डिसेंबर १९२६ - ९ सप्टेंबर १९४२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. शिरीष कुमार यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह बलिदान दिले.
शिरीष कुमार यांचा जन्म महाराष्ट्र - गुजरात सीमेवर वसलेल्या नंदुरबार गावात झाला. व्यापारी शहर म्हणून नंदुरबारची ओळख आहे. शिरीष कुमार यांचा जन्म याच गावात 1926 मध्ये एका गुजराती व्यावसायिकाच्या घरी झाला. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणा पासूनच शिरीष कुमार आपल्या आईकडून स्वातंत्र्यलढ्याच्या कथा ऐकत असत. आझाद हिंद फौजेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा शिरीष कुमार यांच्यावर चांगला प्रभाव होता असे मानले जाते . शिरीष कुमार 12 वर्षांचे असताना ते आजोबांसोबत तिरंगा फडकावून स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते.
१९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले . त्यानंतर गावोगावी लोक तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत बाहेर पडले. ९ मार्च १९४२ रोजी नंदुरबारमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. त्या रॅलीत शिरीष कुमार तिरंगा घेऊन रॅलीचे नेतृत्व करू लागले. त्यावेळी ते फक्त 16 वर्षांचे होते. मातृभाषेतील गुजरातीमध्ये घोषणा देण्यास सुरुवात केली. 'नही शमसे' 'नही शामसे' 'निशान भूमी भारतभूनी', भारत माता की जय, वंदे मातरम, मातृभूमीसाठी त्यांच्या मनात एक वेगळीच उमेद होती.
रॅली शहराच्या मध्यभागी आल्यावर ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याने रॅलीवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. मात्र शिरीष कुमार आपल्या साथीदारांसह रॅलीत ठाम राहिले आणि भारत माता की जय वंदे मातरमचा नारा देत राहिले. यामुळे इंग्रज अधिकाऱ्याला खूप राग आला आणि त्याने निदर्शक लोकांकडे बंदूक दाखवली. शिरीष कुमार त्या आंदोलकांसमोर उभे राहिले आणि इंग्रज अधिकाऱ्याला रागाने बोलले. 'तुम्हाला गोळी मारायचीच असेल तर आधी मला गोळी मारा' आणि हातात तिरंगा फडकावत त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर 'वंदे मातरम - वंदे मातरम' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे इंग्रज अधिकारी अधिक संतापले आणि त्यांनी शिरीषकुमारच्या छातीत चार गोळ्या झाडल्या. आणि त्याच्यासह त्याचे साथीदार लाल-लाल धनसुख ललवाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा यांना गोळ्या घालून शहीद केले.