व्यवसाय ( Business )

व्यवसाय म्हणजे काय ?  व्याख्या, संकल्पना आणि प्रकार

प्रस्तावना

    व्यवसाय म्हणजे मानवी निर्मित वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करणे होय. कारण पूर्वीच्या काळी व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय केला जात होता. तसेच आधुनिक काळात व्यवसायाची संकल्पना बदललेली दिसून येते. यंत्राच्या सहाय्याने मागणीपूर्व मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या संकल्पना विचारात घेऊन व्यवसायाला वाटचाल करावी लागते.

व्यवसायाचा अर्थ व व्याख्या

    व्यवसायाची संकल्पना विचारात घेताना मानवाची उत्क्रांती विचारात घेऊनच व्यवसायाची संकल्पना स्पष्ट होऊ शकते. व्यवसायला इंग्रजीत Business असे म्हणतात. व्यवसाय या संकल्पनेत व्यवसाय म्हणजे वि+अव+तो असा अर्थ विचारात घेतला जातो. मानवाला उदरनिर्वाह करण्यासाठी जो काम धंदा केला जातो त्याला परंपरागत व्यवसाय असे म्हणतात. वाणिज्य शास्त्रात व व्यवस्थापन शास्त्रात देखील व्यवसाय म्हणजे अर्थप्राप्ती होण्याच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न म्हणजेच व्यवसाय होय. पूर्वीच्या काळी व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसाय केले जात होते. त्यामध्ये शेती व्यवसाय, शिकार करणे, पशूपालन करणे या स्वरूपाचे होते. अधुनिक काळात व्यवसायाची संकल्पना व्यापक झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये उदयोगधंदयाची व कारखान्याची निर्मिती होऊन वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती झालेली दिसून येते. उदा. कापड निर्मिती, वेगवेगळ्या मोटर सायकल, घड्याळे, साबण वड्या इ. उदयोगधंदयामार्फत वस्तूची मोठ्याप्रमाणात निर्मिती केली जाते व या वस्तूंची विक्री व्यापारी व वर्गामार्फत केली जाते. यामार्फत नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच व्यवसाय या संकल्पनेत वस्तू व सेवांची निर्मिती करून त्याची विक्री करून नफा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो या संकल्पनेला व्यवसाय असे म्हणतात. व्यवसायामध्ये मोठ्याप्रमाणात भांडवली गुंतवणूक करून उदार निर्वाहसाठी अर्थप्राप्ती करणे हा महत्वाचा घटक समजला जातो. अधुनिक काळात व्यवसायाचे स्वरूप व्यापक झाल्याचे दिसून येते.

"व्यवसाय" हा "व्यस्तपणा" पासून येतो, याचा अर्थ एखाद्या क्रियाकलापात गुंतलेला असतो. सोप्या भाषेत, व्यवसाय म्हणजे कमी किमतीत एखादी वस्तू विकत घेणे आणि जास्त किंमतीत विकणे. या खर्चातील फरक म्हणजे नफा. टोमॅटो 100 रुपये किलोने विकत घेणे आणि 120 रुपयांना दुसऱ्या बाजारात विकणे हे एक साधे उदाहरण आहे; तुम्हाला प्रति किलो नफा म्हणून 20 रुपये मिळतात. व्यवसायाचे प्राथमिक उद्दिष्ट नफा हे आहे आणि ते याच ध्येयाने चालते.

    परंतु, अधिक स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी, "व्यवसाय हा असा कोणताही व्यवसाय आहे ज्यामध्ये विक्रीसाठी वस्तूंचे उत्पादन करणे किंवा खरेदी करणे आणि ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकण्यापूर्वी नफा मार्जिन जोडणे याशी संबंधित सर्व क्रियाकलाप समाविष्ट आहेत." उदाहरणांमध्ये सेवांची तरतूद आणि वस्तूंचे उत्पादन आणि विक्री यांचा समावेश होतो.

    मुख्य मुद्दा असा आहे की व्यवसायाचे उद्दिष्ट नफ्याचे असले तरी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून ते हे साध्य करते. व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय समाविष्ट असतो जेथे लोक उत्पादन, खरेदी, विक्री किंवा इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करून उत्पन्न मिळवतात, सर्व काही नफा मिळवण्यासाठी.

१) प्रा. व्हिलर यांनी केलेली व्याख्या 

“वैयक्तिक नफा मिळविण्याच्या हेतूने समाजाला वस्तू व लोकांचा पुरवठा करण्याकरिता संघटित केलेले क्रियशिल कार्य करणारी संस्था म्हणजेच व्यवसाय होय".

"Business is an institution organised and operated to provide goods and services to society under the incentive of private gain."

२) किथ डेव्हिस यांची व्याख्या

“संघटित प्रयत्नामार्फत वस्तू व सेवांची निर्मिती करणे त्या बाजारपेठेत विक्री करणे व त्याद्वारे अर्थप्राप्ती करणे म्हणजेच व्यवसाय होय.”

"Business means organised efforts by individuals to produce goods or service to sell these goods or services in a market place and to reap some reward for this efforts." by Keith Devis.

३) हॅनेने यांची व्याख्या

“वस्तूच्या खरेदी विक्रीद्वारे उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या निर्मिती करण्याचा प्रयत्नाना व्यवसाय असे म्हणतात.'

"Business may be defined as human activity directed to words producing or acquiring wealth through buying or selling goods" by haney.

    वरील व्याख्येवरून असे दिसून येते की अर्थप्राप्त करण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवांचे उत्पादन करुन त्याची विक्री करण्याचा जो प्रयत्न केले जाते त्याला व्यवसाय असे म्हणतात.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!