६ भाद्रपद दिन विशेष

भाद्रपद महिना हा हिंदू पंचांगा नुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिके नुसार वर्षातला सहावा महिना होय.

 चातुर्मासातील श्रावण महिन्या प्रमाणे भाद्रपद महिन्यातही सण-उत्सवाचा उत्साह असतो. 

        भारतीय संस्कृतीमध्ये पंचांग म्हणून हिंदू कॅलेंडर चा वापर प्राचीन काळापासून होत आला आहे. यांमध्ये तिथींना खूप महत्त्व देण्यात आले आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो कि हि मराठी दिनदर्शिका पूर्णपणे तिथींच्या आधारे बनवलेली असते. आपल्या संस्कृतीमध्ये सण उत्सवांना खूप महत्त्व आहे. मराठी कॅलेंडर मध्ये हे सण तिथीनुसार कधी साजरे केले जातात हे दर्शविलेले असते.

        प्रत्येक महिन्याचे दोन भागात विभाजन केलेले असते. या भागांना पंधरवडा किंवा पक्ष असे म्हणतात. एका महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात. भाद्रपद हा महिना साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर यांदरम्यान असतो. हिंदू पंचागानुसार सहावा आणि चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद सुरू होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरू होतो. यंदा भाद्रपद महिना शनिवार १६ सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि शनिवार १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे.

       भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर पूर्वाभाद्रपदा हे नक्षत्र येते, त्यामुळे या महिन्याला भाद्रपद असे नाव पडले. सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे आगमन भाद्रपद महिन्यात होते. दहा दिवसांचा हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. गौरी विसर्जन व गणपती विसर्जन असे सण साजरे करत हा सण केला जातो. भाद्रपदाचा कृष्ण पक्ष हा पितृपक्ष म्हणून पाळला जातो. आपल्या वाडवडिलांच्या श्राद्धकर्मासाठी हा महिना राखून ठेवलेला असतो. या महिन्यात पडणाऱ्या कडक ऊन्हाला पित्तर पाठाचे ऊन पडतंय असे म्हटले जाते.


कॅलेंडर मधील महिन्यांचा क्रम आणि नावे

हिंदू कॅलेंडर

ग्रेगोरियन कॅलेंडर

क्रम

महिने

क्रम

महिने

=> चैत्र

1

=> जानेवारी

=> वैशाख

2

=> फेब्रुवारी

=> ज्येष्ठ

3

=> मार्च

=> आषाढ

4

=> एप्रिल

=> श्रावण

5

=> मे

=> भाद्रपद

6

=> जून

=> आश्विन

7

=> जुलै

=> कार्तिक

8

=> ऑगस्ट

=>मार्गशीर्ष

9

=> सप्टेंबर

१०

=> पौष

10

=>ऑक्टोबर

११

=> माघ 

11

=> नोव्हेंबर

१२

=> फाल्गुन

12

=> डिसेंबर

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!