ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणने नुसार तिसरा महिना आहे.
जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो.
भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो.
आपले मराठी वर्ष , ज्येष्ठ म्हणजे हिंदू कालगणने प्रमाणे आणि आपल्या मराठी वर्ष गणने प्रमाणे जेष्ठ हा वर्षातला तिसरा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला जेष्ठ महिना असे म्हणतात .वर्षातला सर्वात मोठा म्हणजेच जेष्ठ दिवस याच महिन्यात येतो म्हणूनही जेष्ठ महिन्याचे महत्व आहे. वैशाखातले लांबलेले काही लग्न मुहूर्त या महिन्यात असतात. वैशाखातली गरमी पुढे ज्येष्ठातही अजून चालूच असते. त्यामुळे सगळीकडे गरम झळांचं साम्राज्य असत. जमिनीखालच पाणी पण सुकून जाते त्यामुळे नद्या,विहिरी,तलाव कोरडे पडतात. जेष्ठ आषाढ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतु असतो तो जेष्ठ महिन्यात सुरू होतो. सूर्याच्या उन्हाने खूप तापलेली धरती आणि आपण मानव प्राणीसुद्धा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. या महिन्यात उकाडा अगदी असह्य होत असतो.
कॅलेंडर मधील महिन्यांचा क्रम आणि नावे | |||
क्रम | महिने | क्रम | महिने |