१५ डिसेंबर सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री व उपपंतप्रधान, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
सरदार वल्लभभाई पटेल हे देशातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी कोणत्याही युद्धाशिवाय ५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले होते. यामुळेच लोक त्यांना 'आयर्न मॅन' म्हणतात. आज (15 डिसेंबर) सरदार पटेल यांची 73 वी पुण्यतिथी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण केले. त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्य करत राहू :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X)वर लिहिले, "महान सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशाच्या एकात्मतेप्रती अटल बांधिलकी यांनी आधुनिक भारताचा पाया घातला. त्यांचे अनुकरणीय कार्य एक मजबूत, अधिक एकसंघ देश निर्माण करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करते. आम्ही त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत राहू. त्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्य करत राहू."
भारताचे लोहपुरूष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल : सरदार वल्लभभाई पटेल यांनी नितीगत दृढता आणि मुत्सद्दी धोरणांद्वारे संघटीत भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयास केला. आपल्या राजनैतिक कौशल्याद्वारे स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ ठेवण्यासाठी योगदान देणारे भारताचे लोहपुरूष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ! असं म्हणत शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा