छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या नौदलाचा अभिमानास्पद इतिहास जाणून घ्या..!
भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबरला का साजरा केला जातो?
१७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.
४ डिसेंबर हा दिवस भारतासाठी खूप खास आहे. जो भारतीय नौदल दिन आहे. दरवर्षी या तारखेला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. ४ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नौदल दिन हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नाही तर भारतीय नौदलाला योग्य दृष्टीकोनातून पाहण्याचा दिवस आहे.
१९७१ मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नेव्हीचे उच्चाटन करण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरनार्थ 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो.
भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती त्याला ऑपरेशन ट्रायडंट असे नाव देण्यात आले होते. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. त्यामुळे नेव्हीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नेव्ही डे साजरा केला जातो.
भारतीय नौदलाची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सक्षम आहे. कान्होजी आंग्रे यांचे नौदलामध्ये मोठे योगदान असल्याची उदाहरणे इतिहासात वाचायला मिळतात. त्यामुळेच आयएनएस या नावाने नौदलाची ओळख ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांनी समुद्रामार्गाचे महत्त्व जाणून समुद्र मार्गावर सुरक्षेवर करडी नजर ठेऊन शत्रूला रोखण्याचे काम केले. भारताच्या भौगोलिक रचनेनुसार, देशातील नऊ राज्ये ही समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. जगातील जवळपास ८० टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होते. त्यामुळे नौदलावर संरक्षणाची मोठी जबाबदारी आहे.
१९३४ मध्ये ब्रिटीशांनी 'रॉयल इंडियन नेव्ही' (आरआयएन) या सेनेपासून नौदलाची सुरुात केली. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर 'नौदल दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाचे आहे. जगातील सर्वोत्तम नौदलामध्ये भारतीय नौसेना पाचव्या क्रमांकावर आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तर भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाची ताकद वाढवतात.