2025 या नव्या वर्षी संस्कृती आपली जपू या..! थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Happy New Year 2025 Wishes : बघता बघता २०२४ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल. हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. याच गोष्टी मनात ठेऊन आपण आपल्या आप्तेष्टांचेही हित चिंतत असतो. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही. त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे. मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो. काही लोकांची आठवण आपण रोज काढत नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा त्या व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण एकमेकांना विसरलो हे कधी पटतच नाही. अशा सर्व नातेवाईक, मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.
नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस.
या दिवसा पासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत. बऱ्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेतही १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता.
इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षाचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रुढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील (ग्रेगोरियन) १ जानेवारी हा दिवसपण साजरा करतात. चीनी नववर्ष, मुस्लिम नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष (रोश हशाना) ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे केले जाते. भारतातील अनेक राज्यांत पण नवीन वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत.
भारतात अनेक राज्यांत नवीव वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो.
पंजाबी / शीख धर्मातील लोक बैसाखी या त्यांच्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष साजरा करतात. तमिळ कालदर्शिकेनुसार पुथंडु किंवा पुथुवरुषम पासून नवीन वर्षारंभ होतो त्या दिवशी नव वर्ष साजरा केला जातो. नमीळनाडूतील विविध मंदिर आणि घरांमध्ये उत्सव आयोजित केला जातो. घरांच्या अंगण कोलमनी (रांगोळी) सजवले जाते. हिमाचल प्रदेश मधील डोगरा लोक चैत्र महिन्यात त्यांचे नवीन वर्ष चैत्य साजरे करतात. आसाम मध्ये रोंगाली बिहू हा एप्रिल मध्ये येणारा नवीन वर्षाचा दिवस आहे.
बंगाली बांधव हे पहेला वैशाखला साजरा करतात. हा बांगला देशातील राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो हा एप्रिल मध्ये येणारा सण पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांमध्ये बंगाली परंपरा असणाऱ्या लोकांमध्ये धार्मिक धर्मनिरपेक्ष साजरा होतो. केरळ राज्यात विषु हा सण साजरा होतो. कर्नाटक मधील मंगलोर आणि तुलू भाषिक लोक पण विषु साजरा करतात. हे सर्व दिवस गुढी पाडवा याच दिवशी येतात. यांची फक्त नावे वेगळी आहेत. संपूर्ण मराठी प्रांत ( महाराष्ट्र, गोवा ) व मराठी भाषिक कर्नाटक , तेलंगणा भागांमध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील व तेलंगणातील काही मराठी भाषिक भाग व संपूर्ण जगातील मराठी बांधव गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात.
उगाडी हा हा कर्नाटाकातील नव वर्ष दिन असतो तो गुडीपाडव्याच्या दिवशी साजरा होतो.