०२ डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिवस. (World Computer Literacy Day )

 'जागतिक संगणक साक्षरता दिवस' कोणी आणि केव्हा सुरू केला? जाणून घ्या

World Computer Literacy Day 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIIT) या भारतीय कंपनीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त 2001 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक संगणक साक्षरता दिवस' साजरा केला गेला.

'जागतिक संगणक साक्षरता दिवस' दरवर्षी 2 डिसेंबरला साजरा केला जातो. संगणक साक्षरता जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी आणि विशेषत: भारतातील मुले आणि महिलांमध्ये तांत्रिक कौशल्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 2001 मध्ये संगणक साक्षरता दिन सुरू करण्यात आला. आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे संगणकाचा वापर दैनंदिन कामात केला जातो. अशा परिस्थितीत संगणकाच्या वापराबाबत लोकांमध्ये जागरुकता असणं अत्यंत गरजेचं झालं आहे. मात्र आजही गरीब वर्गाकडं ही सुविधा नाही किंवा त्यांना शिकवण्यासाठी कोणतंही प्रभावी साधन नाही. त्यामुळं आजही बहुतांश लोक या तंत्रज्ञानापासून दूर आहेत.

कधी आणि कोणी सुरू केले : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIIT) या भारतीय कंपनीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त 2001 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक संगणक साक्षरता दिन' साजरा करण्यात आला. जगातील बहुतेक संगणक वापरकर्ते पुरुष आहेत असे लक्षात घेऊन हा दिवस सुरू करण्यात आला. अशा परिस्थितीत महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये संगणकाचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज भासू लागली.

'जागतिक संगणक साक्षरता दिना'चा इतिहास : 'जागतिक संगणक साक्षरता दिन' भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी NIIT ने 20 व्या वर्धापन दिनानिमित्त एक उपक्रम म्हणून सुरू केला. या दिवसाचा पहिला उत्सव 2001 मध्ये झाला. कार्यक्रमातील चर्चेचा विषय हा संशोधन होता. यातून एक गोष्ट सूचित झाली ती म्हणजे संगणक वापरणारे बहुसंख्य लोक पुरुष होते. त्यामुळे 'जागतिक संगणक साक्षरता दिवसा'निमित्त महिलांमध्ये संगणक साक्षरतेवर भर देण्याचा प्रयत्न केला जातो.

'जागतिक संगणक साक्षरता दिवसा'चे महत्त्व : संगणक साक्षरता हे आजच्या समाजातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होतो, मग ते शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा मनोरंजन असो. संगणक साक्षर असल्‍यानं लोक हे नवीन तंत्रज्ञान शिकू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात. ही एक महत्त्वाची संधी आहे जी लोकांना संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाबद्दल शिक्षित करण्याची आणि त्यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्याची संधी प्रदान करते. ही संधी लोकांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास आणि त्यांचं जीवन सुधारण्यास मदत करते.

'    जागतिक संगणक साक्षरता दिवस'  थीम : दरवर्षी 'जागतिक संगणक साक्षरता दिवस' एका विशिष्ट थीम अंतर्गत साजरा केला जातो. या वर्षाची ची थीम 'बदलत्या जगासाठी साक्षरतेला प्रोत्साहन देणे: शाश्वत आणि शांततामय समाजाचा पाया तयार करणे' ही आहे.
 
 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!