Solar Panel : घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा आणि महावितरणच्या वीज बिलापासून मुक्ती मिळवा...!
केंद्र सरकारची रूफटॉप योजना; ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद
सध्याच्या महागाईत प्रत्येकजण बचतीचा प्रयत्न करीत असतो. परंतू घरातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे विजबिल कसे कमी करणे एक प्रकारचे आव्हानच असते.
सध्याच्या महागाईत प्रत्येकजण बचतीचा प्रयत्न करीत असतो. परंतू घरातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे विजबिल कसे कमी करणे एक प्रकारचे आव्हानच असते. उन्हाळ्यात एसी आणि हिवाळ्यात गिझर चालू असल्याने वीज बिले मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे विजबिल कसे कमी करता येईल याचा विचार प्रत्येकजण करतो. वीजबिलांवरून तर सध्या देशात राजकारणही जोमात आहे. काही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांना वीजबिल माफ करण्याचेही आश्वासन देत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा योजनांबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अर्ज केल्यास तुम्हाला 25 वर्षे मोफत वीज मिळू शकते. त्यावर तुम्ही घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सहज वापरू शकता.
आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवा..! विजबिल भरणे कायमचे विसरा....!
देशातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सरकार लोकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी सरकारने एक योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. तुम्ही असे केल्यास सरकार तुम्हाला 40 टक्के सौर पॅनेल सबसिडी देईल. 2 KW सोलर पॅनल सेट बसवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो. मात्र सरकारकडून 40 टक्के सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत केवळ 72 हजार रुपयांपर्यंत खाली येते. या प्रकारचे सोलर पॅनल सुमारे 25 वर्षे टिकते. म्हणजेच केवळ 72 हजार रुपये गुंतवून तुम्ही 25 वर्षे वीज बिलापासून मुक्त होऊ शकता.
आपल्या घरातील कोण कोणती उपकरणे चालतील?
तज्ज्ञांच्या मते, सोलर पॅनल सेटच्या माध्यमातून ३ किलोवॅट पर्यंत वीज सहज तयार होते. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या छतावर हे सोलर पॅनल्स लावले तर दररोज सुमारे १२ ते १५ युनिट वीज निर्माण होऊ शकते. जेणेकरून तुम्ही एसी, गीझर, हिटर, टीव्ही, ३ पंखे, ६ दिवे आणि पाण्याची मोटर सहज चालवू शकता. म्हणजे एकदा सोलर पॅनल बसवले की फायदाच होतो.
सोलार सपसीडी करिता अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
केंद्र सरकारची रूफटॉप योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in वर क्लिक करावे लागेल. यानंतर Apply for solar rooftop नावाचे बटण दाबावे लागेल. तिथे एक पेज ओपन होईल. त्या पेजवर, तुम्हाला तुमच्या राज्यानुसार सबसिडी फॉर्म भरावा लागेल. सुमारे 30 दिवसांनंतर, वीज पुरवठा कंपनी म्हणजेच डिस्कॉम तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम हस्तांतरित करेल आणि तुम्ही पुन्हा सौर पॅनेल बसवण्याची प्रक्रिया सुरू करू शकाल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा