"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.
‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.
हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.
=> आपण आंतरराष्ट्रीय दिवस का साजरा करतो?
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |