30 जानेवारी हुतात्मा दिन.

स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व वीरांना शतश: नमन...!

भारतामध्ये बऱ्येच दिवस हे असे आहेत की जे हुतात्मा दिन म्हणून पाळले जातात. देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलीदाना बद्दल अशा लोकांच्या स्मरणार्थ हे दिवस शहीद दिवस म्हणून पाळले जातात, राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय दिवस म्हणून देखील ओळखला जातो. ज्यामध्ये २३ मार्च आणि ३० जानेवारी हे मुख्यता पुर्ण देशभर शहीद दिवस म्हणून पाळले जातात.

    ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊस मध्ये नाथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. गांधीजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख नेते होते आणि त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाद्वारे भारताला मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची हत्या देशाचे मोठे नुकसान होते.

    बापूंची पुण्यतिथी म्हणजेच ३० जानेवारी हा दिवस शहीद दिन किंवा हुतात्मा दिन म्हणून साजरा करून देश महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहतो. या प्रसंगी, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री राजधानी दिल्लीतील राजघाट येथील गांधीजींच्या समाधीवर पोहोचतात. गांधीजींचे स्मरण करून, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहली जाते. या प्रसंगी देशाच्या सशस्त्र दलातील शहीदांना अभिवादन केले जाते आणि बापू आणि शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळले जाते.

    भारतात शहीद दिन दोनदा साजरा केला जातो. ३० जानेवारी रोजी गांधीजींच्या पुण्यतिथीला, शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद दिन साजरा केला जातो. २३ मार्च रोजी शहीद दिन देखील साजरा केला जातो. दोन वेगवेगळ्या तारखांना शहीद दिन साजरा करण्याबद्दल लोक संभ्रमात आहेत. दोन्ही शहीद दिनांमध्ये फरक आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींची हत्या झाली आणि २३ मार्च १९३१ रोजी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. २३ मार्च रोजी अमर शहीद दिन साजरा केला जातो. या दिवशी या तिन्ही हुतात्म्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जाते.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!