११ जानेवारी श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा वर्षपूर्ती दिन.

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा वर्षपूर्ती 

अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तिथीनुसार आज संपन्न झाला होता. या भव्य सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाले असून याचं दिवशी करोडो हिंदूंची स्वप्नपूर्ती झाली होती. वर्षपूर्ती निमित्त अयोध्येमध्ये श्री रामजन्मभूमी ट्रस्टने हा विशेष सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला जाणारा तीन दिवसांचा वर्धापन दिन सोहळा शनिवारपासून सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या महोत्सवाचे उद्घाटन करणार असून ते रामलल्लाला अभिषेक करतील आणि महाआरती करतील.

    २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला अयोध्येत त्यांच्या भव्य अशा मंदिरात विराजमान झाले. त्या वर्षीच्या शुभ मुहूर्तानुसार, यावेळी प्रतिष्ठा द्वादशी सण ११ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ११ ते १३ जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून अंगद टीला येथे रामलल्लाच्या भक्तांना भोग प्रसादाचे वाटप केले जाईल. प्रतिष्ठा द्वादशी कार्यक्रमाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जाईल.

    वर्षभरापूर्वी अयोध्येत सुमारे ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली होती. मंत्रोच्चार आणि शंख फुंकत पंतप्रधान मोदींनी राम लल्लाला अभिषेक केला. भगवान रामलला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारी सोमवार रोजी १२ वाजून २९ मिनिटांच्या या शुभ मुहूर्तावर प्रभू रामलल्लाला अभिषेक घातला. यानंतर अयोध्यानागरी जय श्री राम-नामाच्या घोषणांनी दुमदुमली. यानंतर राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिवशी देशभरात आनंदाचे वातावरण होते. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देशभरातील अनेक प्रतिष्ठित दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.


 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!