०८ जानेवारी जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन.

८ जानेवारी 'विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये 'विश्व बौद्ध धम्म ध्वजाची' निर्मिती केली. कालांतराने त्याला वैश्विक मान्यता प्राप्त झाली. या ध्वजाला पाली भाषेत 'षडरोशनी ध्वज' किंवा 'धम्म ध्वज' असे म्हणतात.

पंचशील ध्वज

    बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे. जगभरातील बौद्ध अनुयायी या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.

पंचशील ध्वजचा इतिहास

    ध्वज मूलतः रचना इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा (Don Carolis Hewavitharana), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना (Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.

    बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटिश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.कर्नल हेन्री स्टील ओल्कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडा बदल सुचवला.

    इ.स. १८८९ मध्ये सुधारित ध्वज सुरू करण्यात आला व जपानचे अंगारिका धम्मपाल आणि कर्नल ओल्कोट यांनी तो म्यानमारच्या सम्राटाकडे सुपूर्द केला.

इ.स. १९५२ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला.

पंचशील ध्वजची वैविध्यतय 

    संप्रदायिक बौद्ध ध्वज संपूर्ण जगात वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वतःची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.
  • जपानी जूडो शिंशू ध्वजात केसरी रंगा ऐवजी गुलाबी रंगामध्ये बदलेला आहे.
  • थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे, जो पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे पण त्यात धम्मचक्र आहे.
  • नेपाळमधील तिबेटी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भूरकट रंग वापण्यात आला आहे.
  • म्यानमारमध्ये थेरवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाच्या स्थानावर गुलाबी रंगाचा उपयोग केला गेला आहे.
  • थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते.
  • गोशिमिकामाकू जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.
  • अशोकचक्र असलेला निळा भीम ध्वज भारतीय बौद्ध अनुयायांचा ध्वज आहे. हा ध्वज बहुतांश वेळा पंचशील ध्वजासोबतच फडवला जातो, हा निळा बौद्ध ध्वज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आंदोलनाचे प्रतिक आहे.कोरीयन बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे.
  • सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, ज्यामध्ये निळा, पिवळा आणि लाल रंग आहे.
 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!