हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणण्यासाठी आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते.
स्वामी विवेकानंद हे भारतातील थोर पुरुष आणि महान विचारवंत होते. स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी दिनांक १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या थोर संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा जगाला परिचय करून देण्याचे महान कार्य केले आहे.
त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. आणि या परिषदेस संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'प्रिय बंधु भगिनींनो' या शब्दांनी सुरु केल्यामुळे त्यांचे हे शब्द खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान कार्य आणि विचार आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहेत.
असे महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी दिनांक १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |