१८ जानेवारी संत जळोजी मळोजी सुतार महाराज यांची पुण्यतिथी.

संत जळोजी मळोजी सुतार महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

जळोजी मळोजी हे वारकरी सुतार बंधू लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावचे. एकवर्षी पंढरीची वारी जवळ आली असतानाच त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. पण सुतक असतानाही ते वारीला गेले. त्यामुळे भावकी व गावातील इतर लोक नाराज झाले व त्यांना वाळीत टाकले.

    पुढे त्यांना एका घराचे काम मिळाले पण घर मालकाने वारीच्या काळातच काम काढून यांना पंढरीला वारीला गेल्यास सर्व पैसे बुडतील अशी धमकी दिली. पण तरीही जळोजी मळोजी बंधू वारीस आले व पंढरपूरातच राहू लागले. इकडे देवाने त्यांचे रूप घेऊन सुतार काम केले. पुढे पुन्हा गावात आल्यावर या बंधूंना हा प्रकार समजला.

    त्यानंतर दोघे बंधू आपला परिवार घेऊन पंढरपुरात येऊन राहिले. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य गंगूकाका शिरवळकर यांच्या वाड्या मध्ये होते. पुढे मुले कर्ती झाल्यावर दोघे बंधू पूर्ण वेळ परमार्थास देवू लागले. या काळात देवळात सेवा करणे सोयीचे व्हावे म्हणून ते देवळात राहायला गेले. देवळात प्रवेश केल्यावर ज्या ओवऱ्या लागतात, त्यातील उजव्या बाजूच्या एका ओवरीत या बंधूंचे वास्तव्य होते.

    येथे पौष वद्य पंचमीला जळोजींचे निधन झाले. ही वार्ता ऐकून मळोजी यांनीही देह ठेवला . हा दिवस पौष वद्य पंचमीचा होता. त्यांचे अंत्यविधी शिरवळकर फडाने केले. अंत्यविधी पुंडलिक मंदिरा समोर जेथे झाले तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. याशिवाय शेजारीच त्यांचे शिष्य – रामानुज माळी यांची समाधी आहे.

    पुंडलिक मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सुरवातीच्या काळात जळोजी मळोजी हे बंधू पुंडलिक मंदिरापाशी राहत . काही काळ तर शेवाळ खाऊन दिवस काढावे लागले. पुढे देवाने बडवे उत्पातांना दृष्टांत देऊन त्यांना प्रसाद पाठवला. पुढे दोघे बंधू मंदिरात रहात असताना त्यांनी मंदिरातील लाकडी बांध कामात सुद्धा योगदान दिले. काहींच्या मते देवाचा लाकडी सभामंडप यांनी बांधला. 

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!