१४ जानेवारी प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जयंती दिन.

महाराष्ट्रातील अग्रणी समाज सुधारक प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : मुरुड-रत्‍नागिरी, १४ जानेवारी १८८२; - पुणे, १४ ऑक्टोबर १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाज सुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संतति नियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजा मध्ये संतति नियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाज स्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला.

        र. धों. कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

    त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!