१५ जानेवारी नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर यांची जयंती.

रंगदेवतेचे निष्ठावान उपासक नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर यांची जयंती.

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. चित्तरंजन कोल्हटकर हे मराठी नाट्य अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते. ‘भावबंधन’ नाटकातील ‘मोरेश्वर’ या भूमिकेतून ४ फेब्रुवारी १९४४ रोजी कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले.

    तत्पूर्वी १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या ‘गरिबांचे राज्य’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. १९५० मध्ये झळकलेल्या ‘कुंकवाचा धनी’ या चित्रपटात त्यांना नायकाची व्यक्तिरेखा साकारायची संधी सर्वप्रथम लाभली. त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली. त्यानंतर ‘पेडगांवचे शहाणे’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘मोहित्याची मंजुळा’, ‘हिरवा चुडा’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘जावई माझा भला’, ‘तू तिथे मी’ आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले.

    १९६४ मध्ये ‘मोहिनी’ हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. १९४९ मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ‘भावबंधन’ केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या. ‘आग्र्‍याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘पद्मिनी’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘नटसम्राट’ आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच ‘एकच प्याला’, ‘स्वामिनी’, ‘दुरिताचे तिमिर जावो’, ‘गारंबीचा बापू’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘अश्रूंची झाली फुले’ इत्यादी नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. अशा या थोर अभिनेत्याचे २५ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
 
 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!