सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 1953 मध्ये या दिवशी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा निवृत्त झाले.
Armed Forces Veterans Day : देशाच्या रक्षणासाठी सैन्यातील जवान आपल्या प्राणांची आहुती देतात. सैनिकांना त्यांच्या कुटुंबापासून दूर, सैन्यदलाच्या कठोर नियमांनुसार आणि जटील ठिकाणी काम करण्यास भाग पाडलं जातं. निवृत्तीनंतर ते नियमितपणे आमच्यामध्ये राहतात. निवृत्त सैन्यदलाच्या जवानांच्या योगदानाची आठवण म्हणून सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो.
भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा हे 1947 च्या युद्धाचे नायक होते. भारतीय सैन्याला विजय मिळवून देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ते भारतीय सैन्यातून औपचारिकपणे 14 जानेवारी 1953 रोजी निवृत्त झाले. यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी प्रथमच त्यांच्या सन्मानार्थ सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आयोजित केला जातो. निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दिवस दरवर्षी आयोजित केला जातो.
सशस्त्र सेना माजी सैनिक दिनाची पार्श्वभूमी :
- भारतीय सशस्त्र दलांचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा निवृत्त झाल्यामुळं सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
- सशस्त्र दलातील दिग्गजांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आलाय.
- या कार्यक्रमात प्रामुख्यानं सैन्यप्रमुख, नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख उपस्थित राहतात.
सशस्त्र सेना माजी सैनिक दिन माजी सैनिकांची निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्राप्रति त्यांनी दिलेल्या बलिदानाला सलाम.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |