छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहिली ती छत्रपती संभाजी राजे यांनी, १६ जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन असून, प्रियजनांना शुभेच्छा देऊया.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. रायगडावरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला.
दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मुघल सम्राट औरंगजेबाला वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल. पण रायगडच्या सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज बसताच औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजीकडून पराभूत झाला. जेव्हा संभाजी महाराज कपटाने पकडले गेले तेव्हाही संभाजी महाराज यांनी स्वतःवर होणार्या छळ आणि अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला. शेवटी ११ मार्च १६८९ रोजी त्यांचे कैदेत असतांना वीर मरण आले.
भारताच्या इतिहासात १६ जानेवारी ही तारीख खूप महत्वाची आणि अभिमानाची आहे. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात सादरा केला जातो. त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा देऊन हा दिवस आणखी खास बनवा.
स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत, प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर
आपली कारकीर्द तेजोमय बनवणारे, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा..!
हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.
=> धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जीवन चरित्र.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |