‘धर्मनाथ बिज’ म्हणजे काय आहे, जाणून घ्या तीचे महत्त्व.

माघ (Magh) महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज (DharmanathBij) असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा (Diksha)दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी “धर्मनाथबीजेचा” उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या ‘किमयागिरी’ नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्तिनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे. प्रयाग क्षेत्री त्रीविक्रम राजाच्या मृत्यू नंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छीद्र नाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12 व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दिक्षा दिली तों हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो , या दिवशी सर्व नाथ, भक्तगणं, साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ सांप्रदाय अभ्यासायचा आहे ज्यांना दिक्षा दिली जाते.
अलख निरंजन धर्मनाथ बीज सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 |
"वसुधैव कुटुम्बकम्" |
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.