दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, म्हणजेच ब्रेल लिपी शोधणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्मदिन.
World Braille Day : दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. अंध बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म झाला. लुई ब्रेल यांनीच ब्रेल लिपीला जन्म दिला, त्यामुळे आज अंध व्यक्तीही लिहिता-वाचू शकतात आणि पुढे जात आहेत.
जागतिक ब्रेल दिनाचा इतिहासयुनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एक ठराव मंजूर केला. ज्यामध्ये ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन दरवर्षी ४ जानेवारी हा 'जागतिक ब्रेल दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी प्रथमच जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला.
युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जगातील सुमारे ३९ दशलक्ष लोक अंध आहेत तर साधारण २५३ दशलक्ष लोक डोळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत. अशा लोकांसाठी ब्रेल लिपी खूप उपयुक्त आहे.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |