माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस (३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी १९९४ साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांचा मृत्यू २९ जानेवारी २०१९ रोजी ८८ व्या वर्षी झाला.