०१ फेब्रुवारी जयंत साळगांवकर यांची जयंती.

भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घराघरात पोहचणारे अवलिया ! ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

जयंत शिवराम साळगांवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 1 फेब्रुवारी 1929 रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय मोलाची कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला.

    जयंत शिवराम साळगांवकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय मोलाची कामगिरी केली. साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. एकट्या मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा (calendar) खप 48 लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका 1973 पासून प्रसिद्ध होत आहे.कालनिर्णयचे संस्थापक-संपादक असलेल्या जयंतरावांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करून लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते.

जयंत साळगांवकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम :

    जयंत साळगांवकर यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले. श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी होते. आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष. मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष. श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष. श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष. महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष होते. इतिहास संशोधन मंडळामध्ये अध्यक्ष. 1983 अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष. मुंबई येथे झालेल्या 74 व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.

जयंत साळगांवकर यांच्या रचना:

    जयंत साळगांवकर यांनी अफाट लेखन केले. त्यामध्ये ‘सुंदरमठ’ (समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी), ‘देवा तूची गणेशु’ (श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास आणि स्वरुप, तसेच समाजजीवनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा). ‘धर्म-शास्त्रीय निर्णय’ ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन. आतापर्यंत विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध. त्यांनी ‘कालनिर्णय’या नऊ भाषेतून निघणा-या वार्षिक नियतकालिकाचे संस्थापक-संपादक पद भूषवले. ‘देवाचिये द्वारी’ (धार्मिक, पारमार्थिक अशा स्वरुपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने १९९५ मध्ये लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह). ‘दूर्वाक्षरांची जुडी’ (‘देवाचिये द्वारी’ १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन)

    त्यांना मिळालेले पुरस्कार जयंत साळगांवकर यांना ज्योतिर्भास्कर संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी मिळाली. ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी). ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी). महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!