गुलाबालाही काटे असतात, पण त्याचे सौंदर्य कमी होत नाही, तसेच नात्यात किरकोळ वाद होऊ शकतात, पण प्रेम राहिलं तर प्रत्येक नातं खास असतं..!
दरवर्षी ७ फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवसापासूनच व्हॅलेंटाईन वीक सुरू होत असून १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. रोझ डे ला प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाबाचे फुल जोडपी एकमेंकाना देतात आणि प्रेम व्यक्त करतात.
कपल्ससाठी किंवा प्रेमीयुगलांसाठी रोझ डे खूप खास असतो. कारण या दिनानिमित्त त्यांना त्यांचे प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. बाजारपेठ आणि पॉप संस्कृतीमुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. फेब्रुवारी मध्ये येणारा व्हॅलेंटाईन वीक या दिवसापासून, म्हणजे ७ फेब्रुवारीपासून सुरू होतो. या खास दिवशी संपूर्ण बाजार रंगीबेरंगी गुलाबांनी भरलेला दिसतो.
गुलाबाचा रंग आणि सुगंधाने सर्वांना मोहात पाडतो. रोझ डे चा इतिहास युरोपशी जोडलेला आहे, जिथे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी शतकानुशतके गुलाब दिला जात आहे. प्रेमाचे प्रतीक म्हणून व्हॅलेंटाईन डेची सुरुवात १४ व्या शतकात झाली, जो संत व्हॅलेंटाईनशी संबंधित आहे आणि रोझ डेचा इतिहास रोमन पौराणिक कथांमधील देवी व्हीनसपासून येतो. असं मानलं जातं की व्हिक्टोरियन काळाने ही परंपरा लोकप्रिय केली, जिथे प्रेम आणि आदर दर्शविण्यासाठी गुलाब दिले जात होते.
गुलाबाच्या रंगांचा अर्थ
लाल गुलाब:
लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे.हे फुल प्रेम व्यक्त करण्यासाठी दिले जाते.
पिवळा गुलाब:
पिवळे गुलाब मैत्री आणि आनंदाचे प्रतीक आहेत. ते मित्रांना आणि प्रियजनांना दिले जातात.
पांढरा गुलाब:
पांढरे गुलाब निरागसता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत. ही फुले नवीन नातेसंबंधांशी किंवा जीवनातील नवीन अध्यायांशी संबंधित आहे.
गुलाबी गुलाब:
गुलाबी गुलाब कृतज्ञता आणि कौतुकाचे प्रतीक आहेत. तुमच्या मित्रांना, कुटुंबाला किंवा तुमच्या समर्थनासाठी खास असलेल्या व्यक्तीला धन्यवाद देण्याचा हा एक मार्ग असू शकतो.
नारंगी गुलाब:
नारंगी गुलाब आकर्षण आणि उत्साहाचे प्रतीक आहे. एखाद्याला प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी हा एक उत्तम भेटवस्तू पर्याय आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. ![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |