०२ फेब्रुवारी संत तुकाराम महाराज यांची जयंती.

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीने।संत तुकाराम महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. त्यांचा जन्म देहू येथे माघ शुद्ध पंचमीला, अर्थात वसंत पंचमीला ( सोमवार, दिनांक २१ जानेवारी १६०८) झाला. संत तुकाराम यांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) असे आहे. महाराजांच्या आईचे नाव कनकाई बोल्बोबा अंबिले आहे. तर पत्नीचे नाव आवली असे आहे. महाराजांना महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई अशी अपत्ये होती. केशव चैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. तर महाराजांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई आणि संत भगवानबाबा हे होते. त्यांनी रचना केलेले अभंग तुकारामाची गाथा या ग्रंथात समाविष्ट आहे. यात ५ हजारांवर अभंग आहेत. आज त्यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊ या. तुम्ही देखील हे शुभेच्छा संदेश आपले आप्तेष्ट, मित्र आणि प्रियजनांना पाठवू शकता.

तोचि साधू ओळखावा..! देव तेथेची जाणावा..!

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..!

दया, क्षमा, शांती। तेथे देवाती वस्ती।।

सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे

बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।।

शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।

साधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा।।

अज्ञानाच्या पोटी । अवघीच फजिती।।

माणसाने थोडातरी परोपकार करावा.

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही.

सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा.

बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.

चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!