०२ फेब्रुवारी संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी.

3 minute read

चरणावरी माथा नरहरी ठेविला । हृदयी बिंबला पांडुरंग ॥संत नरहरी सोनार यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी, हरि-हराचा वाद मिटवण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक असून, जीवन विठ्ठलमय करणारे संत नरहरी सोनार यांची आज पुण्यतिथी आहे. माघ वद्य तृतीयेला नरहरी सोनार समाधीस्त झाले. परळी वैजनाथ येथे आणि राज्यातील विविध ठिकाणी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते.

    वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी, हरि-हराचा वाद मिटवण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक असून, जीवन विठ्ठलमय करणारे संत नरहरी सोनार यांची आज पुण्यतिथी आहे. माघ वद्य तृतीयेला नरहरी सोनार समाधीस्त झाले. परळी वैजनाथ येथे आणि राज्यातील विविध ठिकाणी संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते.

    नरहरी सोनार यांचा जन्म १३१३ च्या सुमारास श्रावण शुद्ध त्रयोदशीला पंढरपूर येथे झाला. नरहरी यांच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते, असे म्हटले जाते. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी होते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले, असे सांगितले जाते. हा मुलगा हरि (विठ्ठल) व हराचा (शंकर) समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो शिवभक्त असला, तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल, असा आशिर्वाद चांगदेव महाजांनीच नरहरी सोनार यांना दिला होता.

    पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगलीच प्रसिद्ध होती. नरहरी सोनार प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असत, ज्योतिर्लिंगावर बेलपत्र वाहीत. कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची विशेष श्रद्धा नव्हती.

    एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी नरहरी यांनी सोन्याची साखळी बनवली. विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली. मात्र, ती एक वीत जास्त झाली. सावकाराने आपल्या सेवकाला नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. दुरुस्त करून दिलेली साखळी विठ्ठलाला अर्पण केल्यावर ते माप पुन्हा एकदा जास्त झाल्याचे दिसून आले. या प्रसंगामुळे नरहरी सोनार चांगलेच गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे का होतेय, या विचाराने त्यांना ग्रासून टाकले. अखेर स्वतः मंदिरात जाऊन माप घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बांधत असताना, त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले असता, त्यांना शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलच होता. नरहरी सोनार यांनी पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तोच प्रकार घडला. अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत.

    या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरि-हराचा वाद मिटला आणि समाजात, वेगवेगळ्या पंथांमध्ये असलेला हा वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. हरि-हर यांच्या साक्षात्कारानंतर नरहरींचे लक्ष व्यवसायाकडे कमी व भक्तीमार्गाकडे अधिक झाले. अन्य संताच्या सहवासात त्यांना आनंद मिळू लागला. अभंग रचनेसाठी त्यांनी बराच काळ घालवला. संत ज्ञानेश्वर माऊलींचाही त्यांना सहवास लाभला व त्यांच्या ज्ञानाचा, वाणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला, असे म्हटले जाते. संसार करता करता परमार्थ साधता येतो, हे नरहरींनी फार मार्मिकपणे सांगितले. ब्रह्म हे सगुण आहे की निर्गुण? क्षर आहे की अक्षर? या विषयी एखाद्या तत्ववेत्याप्रमाणे सोनाराचा व्यवसाय करणारे नरहरी सहजपणे ब्रह्मतत्त्वाची व्याख्या सांगून जातात. देव एकमेव अद्वितीयआहे. त्याने अनंत रूपे, अनंत वेष, आणि अनेक अवतार घेतले असले, तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजे, असे ते नेहमी सांगत असत. माघ कृष्ण तृतीयेस विठ्ठलाचे नामस्मरण करता करता ते समाधीस्त झाले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरा समोर त्यांची समाधी आहे.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!