०४ फेब्रुवारी रथसप्तमी.

रथसप्तमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.

    रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्म दिवस आहे असे मानले जाते. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदया पूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. सात घोडे (उच्चैःश्रवा) आणि सारथी अरुण (गरूडाचा मोठा भाऊ) यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.

भारताच्या विविध प्रांतांत 

  • कोणार्क - कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्य नारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात. दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यपूजन केले जाते.
  • मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते. या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात.
  • दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावां मध्ये या दिवशी "ब्रह्मोत्सव " साजरा होतो. रथयात्रा काढली जाते.
  • तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धती अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते. बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतांत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

वैदिक देवता

    सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते. गायत्री मंत्र म्हणजेच सविता ( सूर्य) या देवतेचा गायत्री छंदातील मंत्र आहे. सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशाप्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात.

    याच दिवशी नर्मदा जयंती असते. या निमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.

=> काय आहे रथसप्तमीचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!