१० फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन.

आपली खाद्यसंस्कृती आणि सर्वसमावेशक पोषण आहारामध्ये असणारं डाळी व कडधान्यांचं महत्त्व अधोरेखित करूया.

जागतिक कडधान्य दिन दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिवस साजरा केला जातो. लोकांना डाळीचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसंच पोषण आणि अन्नसुरक्षेसाठी कडधान्याची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानवी आहारामध्ये डाळीला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु आजकाल लोकांचा कल फास्ट फूडकडे आहे. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आहारात डाळींचा वापर होत नाहीये. परिणामी शरीराल पोषण घटक मिळत नाही. याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषता: मुलं आणि तरूणांच्या आरोग्यावर याचा जास्त परिणाम होत आहे.

जागतिक कडधान्य दिनाचा इतिहास: 2013 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक कडधान्य दिवस साजरा करण्याच्या करार केला आणि 2016 मध्ये पहिल्यांदा जागतिक कडधान्य दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

कडधान्य खाण्याचे फायदे: 

    वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक सकाळच्या नाश्त्यात कडधान्य घेतात. कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे तसंच पोषक घटक असतात. कडधान्य खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी कडधान्य महत्त्वाची भूमिका बजावतात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास जीवनसत्त्व क मिळतो. तसच फोलेट, मॅग्नेशियम, जीबनसत्व बी3, पोटॅशियम, जस्त, लोह, यासारखे पोषक घटक डाळींच्या सेवनातून मिळतात.

मसूर: मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. तसंच अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन यामुळे डोळ्यांचे आरोग्य चागंल राहते. यात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे हाडांच आरोग्य चांगलं राहतं. ऑस्टिओपोरोसिस सारखा धोका देखील मसूर डाळ खाल्ल्यानं कमी होवू शकते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी देखील मसूर डाळ चांगली आहे.

मूंगडाळ: पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ यांच्या मते, मूंगडाळ सुपरफूड आहे. मधुमेही रुग्णांनी मूंग डाळ खाल्ल्यास डाळीमधील असलेले गुणधर्म रक्तातील साखर संतुलित करते. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर डॉक्टरांच्या साल्लायनुसार आहारत मूंग डाळीचा समावेश करा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मूंग डाळ फायदेशीर आहे. तसंच मूंग डाळीच्या सेवनानं गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्या देखील कमी होतात

तूरडाळ: तुरडाळमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरीची डाळ चांगली आहे. गरोदर महिलांनी तुळीच्या डाळीचं सेवन करावं. यात असलेले फोलिक अ‍ॅसिड गर्भाचा विकास होण्यासाठी महत्तावचे आहेत.

हरभरा: हरभऱ्याच्या डाळीतील एल ट्रिप्टोफॅन मूड सुधारण्यास मदत करते. तसंच भावनिक संतुलन सुधारण्यास देखील हरभऱ्याची डांग फायदेशीर आहे. हरभरा डाळीमध्ये इतर डाळींच्या तुलनेत जास्त प्रतिथे आढळतात.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!