०४ फेब्रुवारी नर्मदा जयंती.

"त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे" नर्मदा जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

हिंदू धर्मात जसे गंगा मातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्नान दिले गेले आहे त्याच प्रमाणे नर्मदा नदीलाही पुण्य मानले गेले आहे. नर्मदा नदीत स्नान केल्याने खूप फायदा होतो. नर्मदा जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केले जाते. जाणून घेऊ नर्मदा जयंती का साजरी केली जाते.

    भारता मध्ये सात धार्मिक नद्या आहेत ज्या अतिशय पवित्र आणि पूजनीय मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नर्मदा नदी. हिंदू धर्मात माघ महिन्यातील शुक्लपक्षातील सप्तमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नर्मदा जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील सप्तमी तिथीला रथसप्तमी देखील साजरी केली जाते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक नर्मदा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये श्रद्धेने स्थान करतात आणि नर्मदा मातेची पूजा करतात.

    नर्मदा नदीत स्नान आणि ध्यान केल्याने पापां पासून मुक्तता होते आणि गंगा मातेचा आशीर्वाद ही प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. नर्मदा जयंती काय असते हे तुम्हाला माहिती असेलच पण नर्मदा जयंती का साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती का? जर नसेल तर नर्मदा जयंती कोणत्या तारखेला आहे आणि का साजरी केली जाते ते जाणून घेऊ.



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!