०४ फेब्रुवारी पंडित बिरजू महाराज यांची जयंती.

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक, पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखले जाणारे ब्रिजमोहन मिश्रा, (४ फेब्रुवारी १९३८, १७ जानेवारी २०२२, दिल्ली, हे कथक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक होते.ते कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज आणि त्यांचे वडील आणि गुरू, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायकसुद्धा होते.

    वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कथ्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली .

    शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा...!  खालील लिंक वर क्लिक करा.

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!