१० फेब्रुवारी बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

Best of Luck..! बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2025 बारावी परीक्षा उद्यापासून 11 फेब्रुवारी सुरू होत आहे.

    दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. या नंतर तुमचे करिअरचे वेगवेगळे मार्ग निवडता येतात. यामुळे करिअरचे अपेक्षित करिअरचे मार्ग निवडण्यासाठी या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करत चांगले गुण मिळवणे आवश्यक असतात.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे सध्या घराघरात अभ्यासाचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टीपेक्षा आकलनावर भर देत आणि लेखनतंत्राकडे लक्ष देत अभ्यास केला पाहिजे. परीक्षा काळात पालकांनी घरातील वातावरण प्रसन्न आणि हसतमुख ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांची शारिरीक आणि मानसिक काळजी घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे.

    दहावी, बारावी म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. नियमित अध्यापनाबरोबरच वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव असे उपक्रम शाळांमध्ये घेतले जातात. विद्यार्थीही या काळात इतर शालाबाह्य कार्यक्रम बाजूला ठेवून अभ्यासासाठी वेळ देतात. तर पालकमंडळीही पाल्याच्या दहावी, बारावीच्या वर्षात मोठ्या कार्यक्रमांना बगल देत, पाल्याच्या तयारीत मग्न असतात. काही ठिकाणी पालकांचे वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. तर अनाठायी मैत्री, टीव्ही, मोबाईल, फाजिल आत्मविश्वास यामुळे विद्यार्थ्यांमध्येही बोर्ड परीक्षेचे गांभीर्य दिसत नाही.

    दहावी, बारावीच्या परीक्षेचे केंद्र प्रत्येक शाळेत नसते. केंद्र असलेल्या काही शाळा दूर अंतरावर असतात. अशावेळी काही पालक स्वतःच्या कामाच्या व्यग्रतेमुळे मुलांकडे दुचाकी देऊन त्याला परीक्षेला पाठवितात. परीक्षेच्या नादात यापूर्वीही अनेक अपघात घडून काही विद्यार्थ्यांनी प्राणही गमवले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलाला परीक्षेला जाण्यासाठी दुचाकी देऊ नये. पाल्याला परीक्षा केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी पालकांनी आपली कामे बाजूला ठेवून वेळ काढला पाहिजे. पालकांनी पाल्याच्या परीक्षेसाठी काढलेला वेळ नंतर स्वतःच्या सुखमय भविष्यासाठी सत्कारणी लागू शकतो.

    सध्या टीव्हीवरील मालिकांनी अक्षरशः वेड लावले आहे. विद्यार्थ्यांसह पालकही मोबाईलच्या आहारी गेले आहेत. परंतु, मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन परीक्षेच्या काळात पालकांनी स्वतःहून घरातील टीव्ही, रेडिओ बंद ठेवला पाहिजे. शेजारील घरांमध्येही रेडिओ, टीव्हीचा आवाज कमी करण्याची विनंती केली पाहिजे. या काळात आईवडील, मोठा भाऊ, बहीण यांनी घरातील वातावरण हसतमुख ठेवले पाहिजे. मुलांच्या संतुलित आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. दररोज मैत्रीपूर्ण वातावरणात त्याचा परीक्षेबाबतचा आत्मविश्‍वास वाढविला पाहिजे. मुलांना पहाटेच्या वेळी अभ्यास करण्यास पालकांनी प्रवृत्त केले पाहिजे.  

    पालकांनीही या दरम्यान त्याच्यासमवेत बसून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल यशासाठी पालक स्वतःच्या इच्छाआकांक्षांना मुरड घालून मुलांच्या शैक्षणिक तरतुदीसाठी पैसे खर्च करतात. पालकांनाही पाल्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शिक्षकही आपला विद्यार्थी यशाची उंच भरारी घ्यावी, याच अपेक्षेत असतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनीही काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. काही विद्यार्थी वर्षभर अभ्यासाबाबत अळमटळम करतात. परंतु, परीक्षा आल्यानंतर मात्र फार तणावात राहतात. परीक्षेसाठी अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. आजपासून जरी दिवसरात्र एक करून आकलनयुक्त अभ्यास केल्यास यशाचे शिखर आपण सहज गाठू शकतो.

आत्मविश्‍वासाने पेपर सोडवा:

    काही विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोचल्यानंतरही घाईघाईत पुस्तक चाळतात. त्यावेळी आपले मन आणि बुद्धी स्थिर व शांत असली पाहिजे. उत्तरपत्रिका, कृतिपत्रिका सोडविताना सुरुवातीला प्रश्‍न पूर्ण वाचून तो समजून घेतल्यानंतर उत्तर लिहिण्यास सुरूवात केली पाहिजे. एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर येत नसेल, तर त्यावरच अडकून न बसता पुढील प्रश्‍नांची उत्तरे सोडविली पाहिजे. पुस्तकातील ओळीच्या ओळी उत्तरात लिहिणे अपेक्षित नाही, तर स्वतःच्या शब्दात त्या प्रश्‍नाचा कल्पनाविस्तार केला पाहिजे. उत्तरपत्रिकेत स्वच्छता आणि टापटीपपणा महत्वाचा आहे. एखादा प्रश्‍न व त्याचे उपप्रश्‍न एकाखाली लिहिणे गरजेचे आहे. भाषा विषयांमध्ये स्वमताचे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना जागृत केले पाहिजे.

    बोर्डाच्या परीक्षेत निर्धारित वेळेत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी लेखनगती अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आकलन पाठांतराबरोबर दररोज लिखाणाचाही सराव करण्याची गरज आहे. परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या लेखनतंत्राकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. सगळं येतं होतं पण वेळच पुरला नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळतात. लिखाणामुळे बोटांवरही ताण येतो. त्यामुळे लेखनतंत्राच्या सरावाकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा वेग वाढविण्यासाठी परीक्षेला अनुसरून वेगवेगळे लिखाण देतात. विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लिखाणाचा सराव दररोज वाढविला पाहिजे.

कॉपी करणे टाळा

    वास्तविक, बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणे हा एक गुन्हाच आहे. यापूर्वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पर्यवेक्षण करणारे शिक्षक किंवा बोर्डाकडून आलेल्या भरारी पथकाने कॉपी सापडलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. कॉपी सापडलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डासमोर सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागते. तर काही विद्यार्थ्यांना तीन वर्षे परीक्षेलाच न बसण्याची नामुष्कीही आली आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाताना त्या विषयाला अनुसरून कोणताही कागद स्वतः जवळ नाही याची खात्री करून घेतली पाहिजे.

बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!