Mahavitaran Smart Meter : जाणून घ्या, Smart TOD Meter लावण्याचे फायदे.

काय आहे महावितरण चे हे नवीन TOD Meter ! प्रीपेड पेक्षा TOD Meter मध्ये काय आहे वेगळं ?

TOD Meter : केंद्र सरकारचे अनुदान आणि विज नियामक आयोगाच्या निर्देशा वरून महावितरण कंपनीने आता आपल्या विज ग्राहकांना प्रीपेड विज मिटरच्या जागी नवीन असे टीओडी विज मिटर बसवून देण्याची सुरूवात केली आहे.(Time Of Day Digital Electric Meters) महाराष्ट्रातील विज ग्राहकांच्या घरात हे टीओडी मिटर लावण्याची पुण्यातुन सुरुवात झालेली आहे.

    राज्यभरात विज ग्राहकांना महावितरण करून बसविण्यात येत असलेले टीओडी TOD Digital Electric Unit Reading Meter.

TOD Meter मिटर नेमके आहे तरी काय? आणि याचा काय फायदा होणार आहे?    

असे प्रश्न पडलेले आहेत. तर चला जाणून घेऊया…प्रीपेड मिटर पेक्षा हे टीओडी मिटर नेमके कसे असणार आहे, आणि यामुळे वीज ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे…..?

    महाराष्ट्रात महावितरण कंपनीने आता प्रीपेड मिटरच्या जागी टीओडी मिटर बसविण्याची सुरुवात केलेली आहे. ही महाराष्ट्रात आणि देशात नवीन विज वापर आणि युनिट रिडिंग डिजीटल प्रणाली आहे. मात्र महावितरणचे नेहमीच्या बिलिंग प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

    महावितरणचे असे म्हणणे आहे की, जुने मिटर प्रीपेड मिटर किंवा सदोष नादुरुस्त मिटरच्या जागी आणि नवीन विज जोडणी मध्ये टीओडी मिटर लावल्यास त्याचा खूप फायदा मिळणार आहे.

TOD Meter हे प्रीपेड राहणार नाहीत हे विशेष.

    सध्याची जी विज वापर प्रणाली आहे,त्यानुसारच आता टीओडी मीटर लावल्यानंतरही पोस्टपेड प्रणाली लागू राहणार आहे हे मिटर वापरताना त्यांचे दर महिने बिल पाठविण्यात येईल.

    मात्र आपण दिवसात, दुपारी आणि रात्री म्हणजे एका दिवसात अर्थातच 24 तासात किती युनिट विज वापरले आहेत, हे विज ग्राहकांना आपल्या स्मार्ट फोन मध्ये असलेल्या महावितरणच्या विशेष एप्लीकेशन मधून मिळणार आहे. सोबतच, विज वापरताना विज ग्राहकांना निर्धारीत वेळेत विज वापरतांना युनिट मध्ये आर्थिक बचत आणि युनिट सवलत सुद्धा मिळणार आहे.

विज बिलिंग मध्ये कोणताही बदल होणार नाही.

    महावितरण कडून बसविण्यात येत असलेल्या टीओडी मिटर मुळे आता दर महिना पुरवठा विभागाकडून पाठविण्यात येणाऱ्या बिल आणि याच्या प्रणाली मध्ये काही बदल होईल का असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलेला आहे.

    तर या संदर्भात महावितरण ने आपल्या पत्रकात स्पष्ट केलेले आहे की, टीओडी मीटर लावल्या नंतर बिलिंग प्रणाली मध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्या जसे दर महिने विज बिल येते, तसेच ग्राहकांना ते मिळणार आहे.

“उल्लेखनीय म्हणजे महावितरण कंपनी कडून कागदी बिला पेक्षा ऑनलाईन बिलिंगची सुरुवातही करण्यात आली आहे, त्या नुसार ग्राहक स्मार्ट फोन द्वारे ऑनलाईन आपले विज बिल पाहून ते महावितरणच्या साईट वरून डाऊनलोड करून नंतर वीज बिलाची ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकतात.”

टीओडी मीटर म्हणजे नेमके आहे तरी काय.

  • महावितरण कंपनीकडून आता टीओडी मिटर अर्थातच टाईम ऑफ डे मिटर लावण्यात येत आहे. महावितरण कंपनी कडून विज ग्राहकांना हे डिजिटल विज मिटर बसवून देण्यात येणार आहे, अशी प्राथमिक शक्यता आहे. या मिटर प्रणालीमुळे विज ग्राहकांना विज युनिट दरांमध्ये आता सवलत सुद्धा मिळणार आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे घरगुती स्वस्त विज दर साठी असलेल्या स्लॅब साठी हे टीओडी मीटर उपयोगात येईल. सोबतच सोलर पावर प्रकल्पांसाठी नेट मिटर सिस्टम आणि अचूक मिटर रिडींग या सर्वांची माहिती वीज ग्राहकांना टीओडी मिटर मुळे मिळेल.
  • ओटीडी मिटर लावल्या नंतर विज वापर, युनिट खर्च, मिटर रिडिंग हे महावितरण कडून उपलब्ध करण्यात येत असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून थेट पाहता येणार आहे.
  • अगदी काही मिनिटांमध्ये विज ग्राहकांना आपल्या टीओडी मिटर मध्ये किती युनिट वीज वापरण्यात आले आणि किती रिडिंग झाली याची माहिती कळेल. {TOD Meter Mobile Application.}

हे सुद्धा वाचा...!  खालील लिंक वर क्लिक करा.

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती. 
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर  सर्व काही व्यर्थ आहे. 

=> आरोग्यम् धनसंपदा.

=> ताज्या बेरी हे सर्वात जास्त रोग प्रतिकारक आणि वयाशी लढणारी फळे का आहेत?

    माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!