कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.

नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.                    
कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग बिजनेस (Network Marketing Business) ला किंवा नेटवर्क मार्केटिंग कंपनीची निवड (Select) करण्याआधी कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत की, नेटवर्क मार्केटिंग कंपनी सोबत जोडणे (Join) आधी तुम्हाला काही मुख्य आणि महत्त्वाचा गोष्टींबद्दल लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे ते पुढील प्रमाणे.

कंपनीचे सिद्धांत योग्य असले पाहिजे.

        कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री (Network Marketing Industry) सोबत जोडणे आधी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्या कंपनीचे सिद्धांत काय आहे आणि कसे काम करते? कंपनी खरंच आपल्या मेंबरला त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे की नाही त्याबद्दल ते सांगत आहे.

कंपनीच्या हेड ऑफिस (Head Office) आणि शाखा (Branch) ची माहिती ठेवा...!

        कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री सोबत जोडण्याचा आधी त्या कंपनीचे मालक कोण आहे, त्या कंपनीची रेपुटेशन काय आहे ज्या कंपनी सोबत जोडले जात आहात त्या कंपनीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या संपूर्ण गोष्टीची पुरेपूर माहिती घेण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीची वेब साईट माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.

गुंतवणूक योग्य आहे की नाही...!

            कोणत्याही MLM Company मध्ये आपले पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याचा आधी याबद्दल व्यवस्थितपणे माहिती मिळवा. ज्या व्यक्तीच्या म्हणण्यावरून तुम्ही कंपनीमध्ये जॉइन (Join) होत असाल किंवा कंपनीमध्ये भांडवल गुंतवणुक (Investment) करत असाल तो व्यक्ती त्या कंपनीमध्ये खरंच काम करत आहे की नाही, तो व्यक्ती Fraud तर नाही ना, यासोबतच ज्या प्रॉडक्ट मध्ये तुम्ही भांडवल गुंतवणुक करत आहात त्या प्रोडक्टची व्यवस्थित माहिती (Information) काढणे गरजेचे आहे.

खोट्या स्वप्ना मध्ये फसवू नका..!

            तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की तुम्ही सिलेक्ट केलेल्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या प्रॉडक्ट मुळे लोकांना फायदा होत आहे की नाही, त्या कंपनी मधील लोकांचे करोडपती बनण्याचे स्वप्न पुर्ण झाले की नाही,आणि त्यासोबतच त्या कंपनीचे सिद्धांत सुद्धा व्यवस्थित आहे की नाही, जर तुम्ही या गोष्टी बघून कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करत असाल तर तुम्हाला नक्कीच आशा कंपनी मध्ये यश मिळणार आहे.

कंपनी सोबत जोडलेले लोक कसे आहे..!

        अशा खूप साऱ्या चांगल्या नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे ज्यामध्ये खूप चांगले लोकं जोडलेले असतात, चांगले लोक म्हणजेच योग्य आणि सकारात्मक विचार असणारे. अशा प्रकारचे लोक कंपनी सोबत जोडलेली असेल तर इतर लोकांमध्ये सुद्धा सकारात्मक ताण निर्माण होते. कंपनीला याश मिळवून देण्यासाठी किंवा इतर कोणतेही कार्य करण्यासाठी सकारात्मकता असणे अत्यंत गरजेचे असते.

            काही अशा प्रकारच्या सुद्धा नेटवर्क मार्केटिंग कंपनी असतात तुझ्या मध्ये लोकांना फक्त पैशांचे लालच दाखवून जोडलेली असतात या प्रकारच्या कंपनीचे मूळ सिद्धांत योग्य नसतात आणि या कंपनीचे काही फ्यूचर प्लान (Future Plan) सुद्धा नसतात.

कंपनी मध्ये ट्रेनिंग दिल्या जात आहे की नाही..!

            जर तुम्हाला तुम्ही निवड केलेल्या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मधून चांगले परतावे (Returns) मिळवायचे असेल तर तुम्हाला याबद्दल व्यवस्थितपणे माहिती गोळा करावी लागेल. तुम्हाला कंपनीच्या इन्कम प्लानचे ट्रेनिंग दिला जात आहे की नाही. कारण कोणतीही कंपनी व तिच्यासोबत जोडलेले लोक तेव्हाच यशस्वी होतात ज्यावेळेस त्या कंपनीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य परतावे (Returns) दिले जाते.

ट्रेनिंग देणे म्हणजे त्या कंपनीसोबत खूप सारे लोक जोडणे असे नाही, या ठिकाणी त्या कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करण्यासोबतच लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग दिल्या जाते कारण की संपूर्ण जगामध्ये कोणतीही कंपनी आपल्या योग्य प्रॉडक्ट आणि सेवांचे बिना ट्रेनिंग दिल्या यशस्वी होऊ शकत नाही.

कंपनीच्या प्रॉडक्टची माहिती..!

        तुम्ही निवड केलेल्या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मधील प्रोडक्ट ची गुणवत्ता (Quality) एकदम चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे, तुम्हाला कंपनी जॉइन करण्याआधी त्या बद्दल माहिती तूमच्या जवळील व्यक्ति कडून मिळवणे आवश्यक आहे की कंपनी आपले किंवा इतर कोणत्या कंपनीचे खराब माल विकत तर नाही आहे. कंपनीचे प्रॉडक्ट साधारण जनतेसाठी उपयोगी आहे की नाही या सर्वांची माहिती तुम्हाला मिळवणे गरजेचे आहे.

Tip : कोणत्याही इतर व्यक्तीचा म्हणण्या नुसार कंपनीमध्ये गुंतवणूक (Investment) किंवा कंपनी जॉइन करू नका कोणतीही कंपनी जॉईन करण्या आधी स्वतःला त्या कंपनीची वरील सर्व पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

            मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल.
            
        तुम्हाला या लेखात नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती बघायचे आहे.

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> नेटवर्क मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे?

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!