जाणून घ्या आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती.

आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती. 

    आधार कार्डचा वापर आपण सर्वांनीच केला असेल काही लोकांनी बँक अकाउंट बनवायला तर काहींनी नवीन सिम कार्ड घ्यायला कोणत्याही प्रकारे का होईना. पण खूप साऱ्या लोकांना आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती माहीत नसेल यासाठी हा लेखात आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. .


    आपण पाहिले असेल की कोणता फॉर्म भरायला, बँक अकाउंट उलाढालीला, नवीन सिम कार्ड घ्यायला किंवा कोणत्या शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायला अश्या खूप साऱ्या सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार कार्ड हे ओळख पत्र (ID Proof) म्हणून मागितले जाते. आजच्या या लेखामध्ये आपण आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. 

आधार कार्ड म्हणजे काय?
    आधार कार्ड हा युनिक्युव आयडेन्टी ऑथरटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) ने भारताच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला एक ओळख क्रमांक आहे. आधार क्रमांक हा 12 अंकाचा असतो यात मध्ये कुठेही अक्षरे नसतात. आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक रहिवाशी साठी आहे ते लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती सर्वानाच आधार अनिवार्य आहे. आधार कार्डवर आपले नाव, गावाचे नाव, जन्म तारीख, लिंग, आधार क्रमांक आणि कोपऱ्यात काळ्या रंगाचा बारकोड दिलेला असतो.

    आधार कार्ड भारताचे  सरकारने २००९  मध्ये सुरू केले होते. UIDAI चे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी एप्रिल 2010 मध्ये आधार चा लोगो जाहीर केला. आधार हा हिंदी भाषेतील शब्द आहे, या शब्दाचा अर्थ मदत किंवा समर्थन असा होतो. पंकज कुमार हे UIDAI/Aadhaar चे आताचे CEO आहेेेत. महाराष्ट्रातल्या रंजना सोनवणे या आधार मिळवलेल्या सर्वप्रथम व्यक्ती आहेत.


आधार कार्डसाठी पात्रता काय आहे?

    आधार कार्ड हे भारतीय नागरिकाचे ओळखपत्र आहे. भारताचा एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात राहत असेल तर तो सुद्धा आधार कार्डसाठी पात्र आहे. आधार कार्डसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे. 

1) आधारसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतात राहणारा भारतीय नागरिक आधार कार्डसाठी पात्र आहे.

2) अर्जदार भारतात न राहणारा, परंतु भारतीय नागरिक आधार 
कार्डसाठी पात्र आहे.

3) भारतात राहणारे विदेशी नागरिक सुद्धा आधार 
कार्डसाठी पात्र आहेत.

4) अर्जदाराचे वय हे 3 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.

आधार कार्ड काढण्यासाठी कोणती 
कागदपत्रे लागतात?   

आधार कार्ड काढण्यासाठी तिन प्रकारचे पुरावे द्यावे लागतात-

1) ओळखीचा पुरावा (Proof of Identity)

2) संबंध पुरावा (Proof of Relationship)

3) जन्म तारीख पुरावा (Date of Birth) 



आधार कार्ड कसे बनवायचे?

जर तुम्हाला आधार कार्ड बनवायचे आहे तर तुम्ही हे नक्कीच वाचले पाहिजे.

1) आधार कार्ड बनवण्यासाठी सगळ्यात आधी जवळच्या Aadhaar Card Enrollment Center मध्ये म्हणजेच सेतू कार्यालयात जावे लागेल.

2) सेतू कार्यालयात गेल्यावर तुम्हाला तुमचा नंबर लावावा लागतो. नंबर आल्यावर तुम्हाला आत बोलावले जाते आणि तुम्हाला त्यांना कागदपत्रे द्यावे लागतात.

3) सेतू कार्यालयात तुमचे डोळ्याचे आणि बोटांच्या ठष्याचे स्कॅनिंग केले जाते.

4) स्कॅनिंग झाल्यावर आता तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. फॉर्म मध्ये किंवा तेच तुमचा फॉर्म भरतात तुम्हाला फक्त तुमची माहिती सांगावी लागते.

5) तुमचा फॉर्म भरून आणि स्कॅनिंग झाल्यावर तुम्हाला एक पावती दिली जाते. दिलेली पावती तुम्हाला जपून ठेवावी लागते.

6) आता तुमचे आधार कार्ड 20-30 दिवसात तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोच केले जाते आणि जर तुमचे आधार कार्ड काही कारणास्तव नाही आले तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ते डाउनलोड करू शकता.

आधार कार्ड चे उपयोग काय आहेत?

    भारत सरकारने आधार कार्ड हे जवळपास सर्वच कामासाठी अनिवार्य केले आहे. आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. खाजगी कंपन्या किंवा बँका सुद्धा आधार कार्ड शिवाय खाते उघढून  देत नाहीत. तर चला आधार कार्ड चे काही उपयोग पण पाहुयात.

1) बँकांमध्ये खाते सुरू करण्यासाठी

2) शाळेत अथवा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी

3) आयकर रिटर्न भरण्यासाठी

4) सिम कार्ड घेण्यासाठी

5) सरकारी योजनांच्या नोंदणीसाठी

    अजून खूप साऱ्या कामांसाठी आधार कार्डची गरज लागते. आता कुठेही जायचे म्हटले तर आधार कार्ड सोबत घेऊनच जावे लागते.

    आता तुम्हाला आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल असे मला वाटते. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अश्या माहितीसाठी माझी मराठी भाषा या वेब साईट वर वारंवार भेट देत राहा.


आधार कार्ड तयार झाले का नाही कसे पहावे?

1) सर्वप्रथम UIDAI च्या आधिकारीक वेबसाईट uidai.gov.in ला भेट द्या.

२) तुमची भाषा निवडा. 

2) वेबसाईट वरील "My Aadhaar" सेक्शन मधील "Check Aadhaar Status" या पर्यायावर क्लिक करा.

3) पुढे तुम्हाला विचारलेल्या जागेवर 14 अंकी EID नंबर टाका आणि Captcha Verification पूर्ण करा.

4) आणि चेक स्टेटस बटणवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे स्टेट्स दिसेल.

डी.

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.

सनएज कंपनी मध्ये काय आहे.

पैसे गुंतवणूक न करता पार्ट टाईम मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

सनएज डायरेक्ट सेलिंग बिजनेस कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार..!

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती .

एफ. डी. एस्. ए. चे ध्येय आणि दृष्टी.

एफ. डी. एस्. ए. काय आहे?

डॉ. अशोक तोडमल सर

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.