भारतात नेटवर्क मार्केटिंग कधी सुरू झाले? | When did Network Marketing start in India?
नेटवर्क मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंगची सुरुवात भारतात 1995 साली झाली.
त्यानंतर फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन ( FDSA ) ची 2011 मध्ये स्थापन करण्यात आली.
भारतात 1995 ते 2015 पर्यंत नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग कंपण्या जलद गतीने वाढल्यात आणि बऱ्याच कंपन्या व काही लोकांना याचा भरपूर फायदा सुद्धा झाला, तर काहींना या व्यवसायात सर्वाधिक फटका बसला. त्या वेळी नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग विक्रीसाठी कोणतेही नियमन नव्हते, त्यामुळे या उद्योगात अनेक फसव्या कारवाया होत होत्या. कारण भारतात त्या वेळेस कोणतेही नियम आणि कायदे लागू नसल्यामुळे कोणीही व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग कंपनी उघडून कोणत्याही प्रकारची योजना सुरू करत असे, त्यामुळे लोकांना दररोज फसवणुकीला सामोरे जावे लागत होते.
त्यानंतर भारतात बऱ्याच संघर्षानंतर 09 सप्टेंबर 2016 रोजी डायरेक्ट सेलिंगसाठी वेगळा कायदा (Direct Selling Law) करण्यात आला आणि काही मार्गदर्शक तत्वे ( Guidelines ) जारी करण्यात आली, तेव्हापासून डायरेक्ट सेलिंग कंपन्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत, अन्यथा डायरेक्ट सेलिंगच्या नावाखाली फक्त भांडवली किंवा गुंतवणूक योजना ( Investment Plan ) चालवलले गेले.
आता जर तुम्ही डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण इथे डायरेक्ट सेलिंगसाठी भारत सरकार कडून एक वेगळी गाईडलाईन बनवण्यात आली आहे,, आणि प्रत्येक डायरेक्ट सेलिंग कंपनीने ही गाईड लाईन पाळली पाहिजे, जर कोणतीही कंपनी डायरेक्ट सेलिंग मार्गदर्शक तत्त्वांनचे पालन करत नसेल तर ती कंपनी बंद करण्यात येते.