पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम.

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. 

आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या  घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही, तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ? जेंव्हा आपल्याला दुखापत किंवा आजार होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर गोळी घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान.

👉 पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.

👉 रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी ( मूत्रपिंड ) संबंधी समस्या होऊ शकतात. तसेच रोज घेतल्याने यकृत सबंधीही समस्या उद्भवतात.

👉 अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.

👉 पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो.

काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.

- जेवल्यावर ३० मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.

- पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.

- जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.

- पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.

- पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!" खालील लिंक वर क्लिक करा.

 => केस गळण्याचे मुख्य कारण काय?

अस्वीकरण: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती. 
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर  सर्व काही व्यर्थ आहे. 

=> आरोग्यम् धनसंपदा.

    माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!